महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या शुभहस्ते अंथुर्णे गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साध्यापणाने साजरी.

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या शुभहस्ते अंथुर्णे गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साध्यापणाने साजरी.
April 14, 2021 04:41 PM ago Indapur, Maharashtra, India

अंथुर्णे, इंदापूर : आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी होत आहे. कोरोना सारख्या महामारीत लोकांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी चा उत्साह दिसून येत आहे.

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 जयंती कोविड चे प्रतिबंधाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.

यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. दत्ता मामा भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजवंदन करून तसेच वृक्षारोपण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळेस अंथुर्णे गावचे सरपंच लालासाहेब खरात, उपसरपंच गणेश शिंदे, मा. सरपंच राहुल साबळे, विशाल साबळे, दत्तू गायकवाड, तानाजी शिंदे, राघु गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण साबळे, अजय भुजबळ, राजेश ढावरे, सोमनाथ शिंदे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस युवराज अण्णा मस्के, महाराष्ट्र सोशल मिडीयाचे अध्यक्ष मा. सतीश भाऊ साबळे, भाजपा पुणे जिल्हा महिला मोर्चा आघाडीच्या शितलताई साबळे, ऍड. किरण धापटे, ऍड. शशिकांत साबळे, ऍड. बापु साबळे, बी. एम साबळे, पपेश भोसले, सतीश भोसले, नाना गोसावी, प्रदीप साबळे, नितीन खरात, गोरख साबळे, बापू गायकवाड, अंकुश गायकवाड, शिवराज साबळे, गवळी सर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबधित बातम्या