महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कुरकुंभ शाखा महावितरण कडून महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान.

एक गाव एक दिवस योजनेंतर्गत देखभाल दुरुस्तीचे कार्य
कुरकुंभ शाखा महावितरण कडून महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान.
March 10, 2021 10:06 PM ago Daund, Maharashtra, India

दौंड-पुणे :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावात महावितरण शाखा कुरकुंभ यांच्याकडून महावीतरणचे ज्या महिलानी १००% कृषी वीज बील भरले आहे त्यांचा महिला दिनानिमित्त प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग्राहकाकडून कृषि वीज जोड साठी कागदपत्र स्वीकारले, शंभर फूट पर्यंत अंतर असलेल्या ५ महावितरण केंद्र कुरकुंभ ग्राहकांनी सुरक्षा ठेव भरली व कनेक्शन देण्यात आले. ज्या ग्राहकांनी १००% कृषि बिल भरले आहे त्याना प्रमाणपत्र दिले.

महिला दिनानिमित्ताचे आचित्य साधून महावितरणच्या वतीने स्वामी चिंचोली येथून शेतीपंपाची पंधरा लाख रूपये पेक्षा चांगली वसूली झाल्याने महावितरण कंपनीच्या नियमानूसार 33% रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात खर्च करायचा असल्याने त्याचे काम लगेच चालू करून महावितरणने गावातील ग्रामस्थांना दाखवुन दिले व गावक-यांनी समाधान व्यक्त केले. गावातील ज्या डीपी चे संपूर्ण विजबिल भरले त्या डीपीची देखभाल दुरुस्ती, गावातील ए बी स्विचचा मेन्टनस, तारा ओढणे, पोल सरळ करणे, कुजलेले स्टे बदलणे इ. कामे करण्यात आली.

यावेळी दौंड उपविभागातील उपकार्यकारी अभियंता वैभव पाटील तसेच कुरकुंभ सहाय्यक अभियंता प्रीतम साळवेकर, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र देहाडे, नामदेव गावडे, सोमनाथ कांबळे, किरण पवार, किरण जगताप, संदीप गाढवे व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच गावाच्या वतीने महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वैभव पाटील यांनी कृषी योजना २०२० बद्दल सविस्तर माहिती दिली व विजबिल भरण्याच्या सुचना ग्रामस्थांना करण्यात आल्या.

संबधित बातम्या