महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे.- मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब.

जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे.- मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब.
2 y 5 m 20 hrs 13 min 16 sec ago Mumbai, Maharashtra, India

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी नागरिकांच्या वन हक्कासंदर्भात आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आदिवासीं जनतेच्या वन जमिनी तसेच विविध प्रश्नांसंदर्भात सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने काम करून आदिवासींचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. यावेळी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी नागरिकांच्या राज्यभरातील वेगवेगळ्या समस्या विविध संघटनांकडुन मांडण्यात आल्या. त्या प्रत्येक मुद्यांवर प्रत्येक जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. यावेळी जमिनी, वन जमिनी या सर्व प्रश्नांबाबत आदिवासी नागरिकांचे रितसर प्रशासनाने म्हणणे ऐकून घेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. वन विभागाने देखील शासन निर्णयासंदर्भात नागरिकांच्या मध्ये जनजागृती करून आदिवासी हितांचे निर्णय घेण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना बैठकीत केल्या.

या बैठकीस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, वन विभागाचे प्रधानसचिव वेणुगोपाल रेड्डी, राष्ट्रीय आदिवासी किसान ब्रिगेडेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीषदादा पेंदाम यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबधित बातम्या